मूर्ख , जास्त मूर्ख आणि महामूर्ख..
दोन मूर्ख , " कोण जास्त मूर्ख आहे?" यावर भांडत असताना आणि आपण त्या भांडणाची मजा घेताना अचानक यात आपण महामूर्ख ठरतोय , असा फील कधी आलाय का? मला आलाय..
लॉक डाऊन मध्ये फेसबुकच्या जरा जास्तच जवळ आलोय. दिवसभरात बऱ्यापैकी वेळ फेसबुकवर व्हिडिओ पाहण्यात जातोय. एकाच विषयावरचे व्हिडिओ बघत गेले की पुढची १०-१५ मिनिटे सारख्याच विडिओंची मालिका चालू होते.
Tiktok वरचे एकसारखे व्हिडिओच्या लिंक फेसबुक दाखवत असते, ते बघून कंटाळलो होतोच, तर मागच्या आठवड्यापासून tiktok विरुद्ध youtube च्या विडिओंचा भडिमार चालू झाला.
जरा खोलात गेल्यावर पहिल्यांदा " carryminati" नावाचा प्राणी कळला. "Tiktok" वरचे पण बरेचसे प्राणी माहीत झाले.
तर या वादाची सुरुवात झाली " carryminati" च्या रोस्टींग ने( आता रोस्टींग म्हणजे काय हे जिद्यासूनी स्वतः जाणून घ्यावे), पण रोस्टींग मध्ये तुमचा शिव्यांचा शब्दकोश जेवढा बहुरंगी आणि मोठा तेवढे तुमचे रोस्टींग जास्त प्रसिद्ध होणार हे मात्र नक्की कळाले.
" tiktokers" कडे " कंटेंट " नसते हा वादाचा प्रमुख मुद्दा आणि यावर वाद गरम झाला.
वाद वाढल्यावर बाकी " memers " मागे कसे राहतील. या वादा वरचे व्हिडिओ बनवून त्यांनी पण आपली पोळी भाजून घेतली आणि तत्सम विडिओंचां रतीब सुरू झाला.
पहिल्यांदा मज्जा म्हणून बघणारा मी हे आपल्याला आणि आपल्या सारख्या लोकांना " मूर्ख " ( चु** हा योग्य शब्द आहे)
बनवतात हे समजले.
कारण "controversy" च्या नावाखाली सगळे प्रसिद्धीसाठी धडपडत होते.
पण मुद्दा हा आहे की ज्या " कंटेंट" वरून हे वाद घालत आहेत त्यांची दोन्हीकडे बोंबाबोंबच. "हमाम मे सब नंगे" यानुसार स्वतः नागडे असताना एकमेकांना चीडवल्यासरखे झाले.
YouTube वाले ऐकलेल्या , न ऐकलेल्या शिव्यांचा भडीमार करून केलेल्या रोस्टींगला " कंटेंट " म्हणणार आणि "tiktokers" नकला ( lipsyncing ), केस रंगवून चित्र विचित्र चेहरे करणे, वेडीवाकडी कंबर हलवत , चित्र विचित्र अंगविक्षेप करत नाच करण्याला " कंटेंट" म्हणणार.
कोणी मी " carryminati " चे रोस्टिंग बघतो म्हणजे त्याची अभिरुची फार उच्च दर्जाची आहे असे तर अजिबात नाही.
बाकी YouTube वर शैक्षणिक/संगीत/खाद्यपदार्थ कृती/ सिनेमे हे चांगले " कंटेंट " आहे. आणिपण " carryminati " सारखे youtuber
आणि बाकी tiktokers बघून वाईच्या संस्कारी मातीत जन्म घेवून चूकच केली असे वाटायला लागले. भरपूर शिव्यांचा संग्रह करून एक YouTube चॅनेल काढून त्यावर पारावर एखाद्याची जशी खेचतो तशी खेचली तर नक्की प्रसिद्ध होवू असा नवा फॉर्म्युला मनात तयार होवू लाग ला.
त्यामुळे यात " मूर्ख " आणि " जास्त मूर्ख" हे सांगणे म्हणजे कोळसा जास्त काळा की डांबर हे सांगण्याइतके अवघड आहे.
या सर्वाकडे वेळ देण्याइतपत आपल्याकडे वेळ आहे म्हणजे आपण पण मूर्ख कॅटेगरीत आहोत असे वाटतेय.
"YouTube" - अमेरिकन
"Tiktok " - चायनीज
"वाद घालणारे " - भारतीय
म्हणजे यांच्यापेक्षा आपण " महामूर्ख " ठरतोय असे लक्षात आल्यावर हा लेख लिहायला घेतला.
टीप - " carryminati" च्या व्हिडिओ ला पाहिजे तेवढ्या व्ह्यूज मिळाल्यावर आणि आपली पोळी भाजून घेतल्यावर पॉलिसी च्या नावाखाली YouTube ने हा व्हिडिओ काढून टाकला आहे.
© अभिजित गायकवाड
ConversionConversion EmoticonEmoticon