Udbatti, Agarbatti

आत्ता घरी येता येता मित्राच्या दुकानात थांबलो. त्याच्या दुकानाबाहेर 3 चौरसाकृति बाचकि होती. त्याच्याशी बोलता बोलता मी त्या बाचक्यावर टेकलो आणि माझ्या पार्श्वभागि सहस्त्रावधि सूया एकदम टोचाव्या तशी वेदनेची कळ माझ्या मस्तकात गेली.
मित्र हसायला लागला.
Add caption

मी त्या बाचक्यात काय आहे चाप्सुन बघू लागलो. बाचक्याला असणाऱ्या फटीमधे बोट घालून बघितलं तर काड्यासदृश काही हाताला लागलं. मी4-2 काड्या बाहेर काढल्या.
उदब्त्त्या
मित्र म्हणाला," अरे मांढरदेव चा एक दुकानदार माझं गिरहाइक आहे. त्याचा माल आलाय. मी उतरवुन घेतलाय. जरा वेळानी तो येऊन घेऊन जाईल"
आता उद्बत्त्या म्हणल्यावर मी सहाजीकच वास घेऊन बघितला
अक्षरशः त्यातल्या एकाही काडिला काडिमात्रहि वास नव्हता.
मी म्हणालो," काय राव लोक आहेत. नक्की कुणाला फसवताहेत; देवाला की स्वत्:ला?? कारण वास शेवटी आपणच घेतो ना!"
म्हणाला," अरे ईथे जत्रेला असाच माल लागतो. आणि सगळीकडे असाच असतो. आणि यावर एक उपाय आहे. चार काड्या या लावायच्या आणि एक वासाची लावायची. शेवटी धुर झाला की काय कळतय; कुठली वासाची आणि कुठली बिनवासाचि"
मी म्हणालो," नाही शक्क़ल चांगली आहे पण अक्कल चांगली नाही. देवाच्या दारी प्रसन्नता निर्माण करणाऱ्या उद्बत्त्या चारआठाण्यात मुठभर घ्यायच्या आणि लोकांचे वाटोळे करण्यासाठी वापरात येणारी एकधारि लिंबं मात्र 100 रु असली तरी घ्यायची"
म्हणाला," आयला तुझ्या ... ला काड्या टोचल्या त्याचा धुर तू  ईथे काढू नको. आणि तू बसलायस म्हणल्यावर त्या उद्बत्त्या वासाच्या जरी असत्या तरी आत्ता बिनवासच्या झाल्या असत्या. ह्यह्यह्या"
मी म्हणालो," हो खरं आहे तुझं पण ह्या उद्बत्त्या बिनवासाच्या आहेत आता मी बसलोय म्हणल्यावर वासाच्या झाल्यात का ते बघ. पेटव हे घे"
त्याला मी काय बोलतोय हे कळायच्या आधीच मी तिथून निसटलो
ह्या ह्या ह्या

मंदार खरे
Previous
Next Post »