Comedy kissa in lockdown

आत्ता सकाळी मंडई बसली आहे की नाही हे बघायला बाहेर पडलो. आणि आज पहिल्यांदाच वाईमधे लॉकडाउन आहे हे जाणवलं. एकही माणूस रस्त्यावर नव्हता. पर्यायाने कोणीच संवाद साधायला नसल्याने मी देखील घरचा मार्ग धरला.🏃
नगरपालिकेपाशी आलो तर आतून एक कर्मचारी बाहेर डोकावला म्हणून त्याच्यापाशी गेलो ," आज आजिबातच बसून दिली नाही की काय मंडई?"
" अरे बसतायत की इकडे तिकडे! फक्त आता मुख्य मंडई मधे येईनात लोकं विकायला"
" कसे येतील? बसेपर्यंत उठा उठा करतायत. मग या या आणि जा जा असेल तर कशाला येतील"
" तेहि खरच आहे तुझं. पण करता काय! आपल्या हातात काय आहे" तो बोलला
" हम्म! तेहि खरंच! गाड़ी आणली आहे का तुम्ही? जरा चावी देता का भाजी घेवून येतो कुठूनतरी😊" मी असं बोलल्यावर म्हणाला ," 😲अरे समोर तर रहातोस ना! तुझी गाड़ी काढ़ की " 
मी बोललो," अहो पकडतायत ना आजकाल गाड्या; मग कशी काढ़णार?😞"
" हम्म म्हणजे पकडली तर आम्हाला बसु दे बांबू! गप जावा घरी आणि असेल ते बनवून खा. रोज रोज नॉनवेज बनवायची काही गरज नाही 😠"
त्याने असं बोल्ल्यावर मी आवाक झालो
" अहो, मी नॉनवेज आणायला चाललोय हे तुम्हाला काय माहिती?🤔" 
"मग आम्हाला काय माहित नाही होय 😠 आखख्या गावाला माहितेय. तुझ्या fb च्या नॉनवेज पोस्ट  बघून परवा आमच्या घरात वादावादी झालिये. बायको बोलली हे बघा! लोकांना सगळं मिळतंय. आणि तुम्ही बंद आहे बंद आहे करता.#@$%😠"
अहो त्या add असतील मला. म्हणून दिसले असतील फ़ोटो त्यांना 🤗" मी हलकेच उत्तर दिले.
" असतील नाही होत्या. Fb बंद करून टाकलंय तिचं 😠😠"

आभाळ फाटलंय पळा पळा 😜
🏃🏃🏃
ह्या ह्या ह्या
MK
Previous
Next Post »