नाही हो करत तो एकदाचा दाखल झाला. एकटा आला नाही तर येताना फेसबुक वर कविता, चारोळ्या आणि ढीगभर पोस्ट देखील घेऊन आला
पाऊस म्हणजे मौजमजा ,पाऊस म्हणजे हिरवळ ,रोम रोम पुलकित करणारा वर्षाव, हर्षोंल्लासित वगैरे वगैरे (मी आता सौमित्र बनत नाही)😉
पण याच पावसाची एक दुसरी बाजू पण आहे ते म्हणजे वारंवार शरीरातील अनावश्यक जलउत्सर्जन करण्याचा वारंवार होणारा त्रास😆
आज दुपारी मंडई मध्ये गेलो आणि प्रसाधनगृहात जाण्याची गरज भासल्याने तिथे गेलो.आमच्या वाईमध्ये मंडईमध्ये एकच प्रसाधनगृह आणि संपूर्ण तालुका मंडईमध्ये लोटतो तेव्हा ही भली मोठी रांग त्याच्या बाहेर लागलेली दिसते पावसाळ्यात तर काही विचारूच नका.
नोट बंदीच्या काळानंतर एखाद्या ठिकाणी लागलेली ही भली मोठी रांग मी पहिल्यांदाच बघितली .नाही म्हणायला हायवे पाचशे मीटर अंतरावरील दारू दुकाने व बार बंद झाल्यानंतर मद्यालयाच्यासमोर अशा लागलेल्या रांगा मी अनेकदा बघितल्या होत्या.😂
पण नोटबंदी च्याकाळात रांगांमध्ये लागून अनेकांना जीव गमवावा लागला याचा बाऊ केला गेला आणि सरकारवर नाही नाही ते आक्षेप घेतले गेले.
असो पण मद्यालया समोर रांगेत उभे राहून कोणाचाच जीव गेला नाही हे विशेष 😉
तर प्रसाधन गृहाच्या बाहेर गेल्यानंतर त्या रांगेत मी देखील उभा राहिलो अनेकांच्या चेहऱ्यावर व्याकूळ भाव होते.
काहींच्या हालचाली तर मेरा टाईम आयेगा ,मेरा टाईम आयेगा या रैपवर रणवीर सिंग देखील नाचला नसेल अशा होत्या.😂
प्रसाधन गृहाच्या दरवाजावर पोचल्यावर तर असे काही आनंद आणि व्याकूळता याचे संमिश्र भाव डोळ्यावर मध्ये दिसत होते की जसे काही स्वर्ग आणि नरक याच्या अगदी उंबरठ्या आपण आलेलो आहोत आणि आता विसर्जन आणि मोकळा श्वास (तिथला वास बघता श्वास गुदमरतो खरं तर. मोकळा श्वास हा शब्दशः अर्थ न घेता रूपकात्मक घ्यावा. मनावरील व शाररिक दड़पण कमी झाले या अर्थाने 😀😀😂)
अशा परिस्थितीमध्ये समोर लावलेल्या भित्तीपत्रकांवर इराणी डॉक्टरचा पत्ता ,तो ज्या आजारांवर उपचार करतो ते आजार वगैरे वगैरे वाचण्यात कोणालाच रस नसतो हेच खरे.😂
पण काल रांगेतल्या लोकांच्या एकंदरीत हालचाली व हावभाव बघितल्यानंतर मला कासावीस व व्याकूळ या दोन शब्दांमधला मधला फरक कळला.
मद्यालयाबाहेर रांगेत लागणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतो तो कासावीसपणा आणि प्रसाधनगृहात च्या बाहेरील रांगेत लोकांच्या चेहऱ्यावर दिसते ती व्याकुळता.
एकाठिकाणी शरीरातील द्रवतत्व वाढते तर एका ठिकाणी कमी होते. दोन्हीत फ़रक असला तरी या गोष्टी परस्परपूरक आहेत
एका रांगेत लागले की दुसर्या रांगेत उभे रहावेच लागते.😂😂😂
ह्या ह्या ह्या
मंदार खरे
ConversionConversion EmoticonEmoticon