Harne bandar Paplet Masa
आम्ही हर्ण्ने बंदरला गेलो. आणि मच्छी बाजारात जायला थोडा उशिर झाला. गेलो तर एक सारंगा (पापलेट) शिल्लक नव्हता. मच्छी मार्केट ला लेट झाल्याच्या पापाची शिक्षा पापलेट संपल्यानी आम्हाला मीळाली.
तर मजा अशी झाली की पापलेट न मीळाल्याने आम्ही हलवा विकत घेतला.
तिथे कराड ची काहि मुले आली होती. त्यानी पण मासे घेतले होते. रेतितुन जाताजाता त्यांच्यातल्या ज्या मुलाच्या हातात माशाची carrybag होती तो मागे राहिला. तो आणि मी सामानांतर चालत होतो. ओळख ना पाळख.पण त्याच्या sandal चा बंद तुटला. तो ते बसवन्यासाठी थांबला
माला म्हणाला भावा जरा पिशवी धर रे. मी ती घेतली आणि त्याचे काम झाल्यावर त्याला पिशवी परत केलि.
आणि होटल मधे गेलो. पिशवी उघडली तर काय! आत पापलेट
हाहाहा
झाल! काम फत्ते. तकदीर मेहरबान
यथेच्छ ताव मारला आम्ही.
आणि संध्याकाळी beach वर फिरायला गेलो तर समोर कराडकर दत्त म्हणून हजर.
आता काय बोलणार. माझी आवस्था फार विचित्र झाली
तेवढ्यात सकाळचा मुलगा हसला आणि म्हणाला ,"sorry हा भाऊ, अरे चुकुन तुमचे पापलेट आम्हाला आले. आमच्यापेक्षा तुमचे पापलेट आकरानी मोठे होते. पण तुम्हाला कुठे शोधणार? त्यामुळ आम्ही ते खाल्ले. sorry ह"
निर्विकारपणे मी म्हणलो ,"जाऊ दे रे, तुम्ही खाल्ले काय आणी आम्ही खाल्ले काय! मासेच ते"
हीहीही
याला म्हणतात चोर तो चोर आणि वर शिरजोर.
आम्ही लेट करून पण पापलेट आणि वेळेत गेलेल्याना हलवायची वेळ आली.
त्यांच्या अज्ञानाचा फायदा आम्हाला झाला.
तेव्हा सज्ञान व्हा
मंदार खरे
हया ह्या ह्या
ConversionConversion EmoticonEmoticon