आत्ता आत्ताच काही दिवसांपूर्वी आम्ही एका हॉटेल मधे तिघे मित्र जेवायला गेलो होतो.
शेजारच्या टेबल वर दोघेजण बसले होते. त्यांच्या टेबल वर चंद्रयान मोहिमेतील बाटलीरूपी यान लाल इंधनाने खच्च भरेलेले होते. त्यातील एकाने ग्लास भरून अंतराळवीर बनण्याच्या मिहिमेची नांदी देखिल केलेली होती. तर दुसरा यानात बसावे की नाही या अस्व्स्थ जाणिवेने बेचैन आणि संभ्रमीत होता.
"अरे भर रे! कशाला इतका विचार करतोयस?" पहिला त्याला उत्तेजनात्मक प्रोत्साहन देऊन अंतराळवीर बनवू पहात होता
"अरे नको! आज बायकोने सक्त ताकीद दिलाये. आज गोंदवलेकर महाराज जयंती आहे. काही खायचे नाही आणि प्यायचे नाही" त्याच्या ह्या उत्तराने पहिला काहिसा हिरमुसला. आता हे आख्खे यान ईंधन संपेपर्यंत आपल्या एकट्यालाच अंतराळात हिंडवायचे आहे या जबाबदारीची त्याला जाणीव झाली.
थोड़े इंधन कमी झाल्यावर परत तो म्हणाला," अरे घे रे थोड़ी! बायकोला काय कळतय... "(वगैरे वगैरे)
आधीच चलबिचल असलेला यानापर्यंत आलेला पण मोहिेमेत सहभागी न झालेला दुसरा अखेरीस ग्लास पुढे करून यानात बसायला सरसावला.
थोड़े कामकाज झाल्यावर परत तो म्हणाला," ए आता मला बास हां. बायकोनं सांगितलय आज गोपाळकर महाराजांची जयंती आहे. काय खायाचं नाय आन काय प्यायाचं बी नाय!"
"अरे खायचय कशाला?हे एवढं संपलं की निघायचय आपल्याला!" पहिला म्हणाला
" ओक्के! बॉस. पण खायाचं नाय हं काय!"दुसरा जरा दटावत म्हणाला.
परत यानाचा एक्सलेटर जोरात दाबुन यान पुढे झेपावले.
त्यांचे बेफाम यानचालन कौशल्य बघुन वेटर तिथे आला. त्याला बघुन परत हा म्हणाला
," ओय! आपण आज क्काय खाणार नाय! बायकुने सांगितलय आज गोंधळकर महाराज येणार हायेत."
हे सगळं बघुन ह्या गोंधळ करणाऱ्या दोन अंतराळ विरांना हॉटेल स्टाफने रिक्षेत बसवुन अंतरीक्षात पाठवून दिले आणि त्यांचे इंधन संपलेले यान टेबलवर घरंगळत होते
ह्या ह्या ह्या
मंदार खरे
(सत्यघटना )
ConversionConversion EmoticonEmoticon