Chicken


काल आमच्या मातोश्री पुण्याला गेल्या. याचे औचित्य साधुन मी चिकन बनवण्याचे ठरविलं. चिकन आणण्यासाठी दुकानात गेलो.
चिकन 190 rs किलो आणि जिवंन्त कोंबडी 120 rs असा फलक.
मी म्हणालो जिवंत कोंबडी दे आणि वर 20-30 rs देतो
म्हणाला ,"जमणार नाही"
मी म्हणालो "का?"
म्हणाला "तयार चिकन 190 ला आहेच कि"
मी म्हणालो ," बघ, नंतर शब्द फिरवू नको"
म्हणाला," आता त्यात शब्द काय फिरवायचाय? बोर्ड लावलाय कि एवढा मोठा"
मी म्हणालो ," हम्म, हे घे 190 rs. आणि दोन तासांनी येतो न्यायला. रस्सा जरा घट्ट ठेव आणि कट दे भरपूर. लागलं तर पाणी टाकीन मी"
म्हणाला," हे काय??"
म्हणालो," अरे तूच म्हणालास ना कि तयार चिकन 190 किलो. आणि आत्ता लगेच शब्द फिरवतोयस"
म्हणाला," इथं भेटलायस वर भेटू नको"
म्हणालो," कोंबडी तू कापणार आहेस कि कोंबडी तुला? वर कुठे जातोस इतक्यात"
ह्याह्याह्या
म्हणाला," मंदया तू फुकट ने पण डोक्याची मंडई करू नको"
मी म्हणालो," तसं मी फुकट काही घेत नाही. पण हो; तुझ्या डोक्याची मंडई होण्यापासून थांबवायचा मोबदला म्हणून देत असशील तर माझी काही हरकत नाही"
ह्याह्याह्या
मस्त कोंबडी आणि वीतभर तंगडी
मंदार खरे


Previous
Next Post »