आज संध्याकाळी मंडई मधे उभा होतो. जवळ मित्राची कच्छी दाबेली ची टपरी होती. अचानक गिर्हाइक वाढलं आणि झुंबड़ उडाली. मला म्हणाला," भावा नुसताच उभा आहेस तर मदत कर ना मला राव"
आता मी नक्की काय करावे हे त्याला आपेक्षित होतं देव जाणे. त्यातही आमचा खांदा अजूनही दुखापत ग्रस्त;मधून आधुन कळा मारतात
मी म्हणालो," मदत म्हणजे नक्की काय करू?"
म्हणाला," दाबेल्या भाज"
मी लगेच सराईत असल्याप्रमाणे त्याला दाबेल्या भरायला सांगून तव्याचा ताबा माझ्याकडे घेतला.
मी दाबेली भाजत असताना तो भरत होता पण त्याची नजर माझ्याकडे होती.
एकंदरित माझं बटर लावण्याचं प्रमाण बघता त्याला घाम फूटत होता. 'भिक नको पण कुत्र आवर'अशी काहीशी गत त्याची झाली असावी.
मला म्हणाला," एक काम कर;मी भाजतो, तू भरायला घे"
आमचा मोर्चा आम्ही लगेच दुसरीकडे वळवला. एकतर मी नवशिखा त्यात गोड चटणी, तिखट चटणी, मसाला शेंगदाणे, कांदा, सारण सगळी गुंतागुंतच होती. गड़बड़ीमधे एका दाबेलीला मी गोड चटणी म्हणून तिखट चटणीच भरपूर लावली. सगळी भरल्यावर माझ्या ते लक्षात आलं खरं; पण मी निरागस पणे ती दाबेली तव्यावर ठेवली. संपूर्ण तवा दाबेल्यांनी भरलेला होता.
दाबेली भाजता भाजता ईकडची तिकडे- तिकड़चि इकडे अशा दाबेल्या तव्यावर फिरत होत्या. आता ही तिखट झालेली दाबेली नक्की कुठल्या नशीबवान व्यक्तीच्या नशिबात होती देव जाणे.
मी कुतुहलाने सगळ्या खव्य्यांचे चेहरे बघुन कयास लावत होतो. पण हैश हुश करताना कोणी दिसेना.
चला! बोंबाबोंब झाली नाही आपण सुटलो अशा आविर्भावात मी सुटकेचा नि:श्वास सोडला. तोवर गिर्हाइक आटोक्यात आले
मी हात धुतले तर मित्र म्हणाला," काय राव भाऊ? एवढी मदत केलिस दाबेली खा ना राव!"
मी देखील होकारार्थी मान हलवली आणि दाबेलिचा घास घेतला आणि 'हे राम!'
नाकातोंडातून धुर. मित्र हसायला लागला
म्हणाला," भाऊ ती दाबेली मी तव्यावर बाजूला ठेवली होती. माझं लक्ष होतं तुझ्या दाबेली भरण्याकडे. धंद्यात् कधीही कोणावर विसंबुन राहु नए. आपल्या धंद्यावर आपले लक्ष पाहिजेच्. धंद्यात् नाव कमवायला वेळ लागतो पण एकदा का गिर्हाइक नाराज झालं की विषय संपला"
त्याचं हे तत्वज्ञान बरोबर होतं पण त्यासाठी माझं तोंड पोळलं होतं. मी त्याच्याकडे बघुन म्हणालो
," धंद्यात् नाव क़मावणं वगैरे ठीक आहे पण एक विसरलास गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तो खरा मित्र. मग तो त्यावेळी जी काही कृति करेल ती आपल्या भल्यासाठी असते तेव्हा गिरहाईक कमावण्यापेक्षा हाकेला ओ देणारे मित्र कमावणे त्याहुन अवघड"
माझं हे तत्वज्ञान त्यालाही पटलं आणि 2 गरमागरम दाबेल्या माझ्या डिश मधे आल्या आणि त्या हदडून माझी पावलं घराकडे वळली.
ह्या ह्या ह्या
मंदार खरे
1 Comments:
Click here for Commentsmastach mandu
ConversionConversion EmoticonEmoticon